Sunday, 7 July 2013

विश्व शांतीदूतावर भ्याड हल्लाजगाला शांती, प्रेम व अहिंसा या त्रयत्रीचा संदेश देना-या तथागत बुद्धाच्या मर्मस्थळावर हल्ला करना-या दूषित वृत्तीचा निषेध शांतीदूताच्या चाहत्यांनी शांतपणे केला पाहिजे. हा हल्ला मुस्लिम आतंकवादी वा भारतातील जातीयवावाद्यांनी केला हे अजून स्पष्ट झालेले नाही. तरी यातून दोन बाबी सूचक वाटतात. म्यानमार मध्ये बुध्दिस्ट व रोहिंग्या मुस्लिम यांच्यात झालेला तनाव व
दंगल. अजूनपर्यंत कोणत्याही मुस्लिम संघटनेने या बाम्बस्फोटाची जबाबदारी घेतली नसल्याचे दिसते. म्यानमार मधील घटनेचा भारतातिल बौध्द व विहारांशी सबंध जोडणे हे सुध्दा अनाकलणीय आहे.  तर दुसरी बाब म्हणजे भारतातील भगव्या दहशहतवाद्यांनी घडवून आणलेले स्फोट. संघाने नरेंद्र मोदीना बीजेपीचा निवडणूक प्रमुख व संभाव्य पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निश्चित केल्यानंतर देशात जातीयवादी वातावरण निर्माण करण्याचे मनसुबे जातीयवाद्यांनी आखले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार भाजपापासून दूर झालेल्या नितीश कुमारांना अद्दल घडविण्यासाठी बोधगये मध्ये स्फोट घडविण्याचे षडयंत्र आखले असावेत ही शक्यता नाकारता येत नाही. विनोद मिस्त्री या हिंदू संदिग्ध व्यक्तीस एन. आय. ए ने अटक केल्यामुळे भगव्या आंतकवादाची पुष्टी होत असून देशातील दलित मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करण्याचे कुटिल कारस्थान रचण्यात आल्याचे निष्पन्न होते. देशात 2014 साली होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत देशाची सत्ता आपल्या हातात घेण्यासाठी आर. एस. एस. चातकासारखी वाट पाहत आहे. आर. एस. एस. च्या पिलावळीने आखलेल्या योजनेचा हा एक भाग असू शकतो. एन. आय. ए. च्या चौकशीअंती सत्य बाहेर येईल. मात्र आंबेडकरवादी तसेच तथागताना मानणा-यांनी बुध्दाचा संदेश समोर ठेऊनच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली पाहिजे. हिंसेचा त्याग करीत सर्व बौध्दानी संकटाचा मुकाबला करण्यासाठी एकत्र येणे फार गरजेचे आहे. एकतेमध्येच शक्ती असते (Unity is the strength) हे तत्व समजने गरजेचे असून गटातटात विखुरलेल्या आंबेडकरवाद्यांनी व बौध्द संघटनांनी यातून बोध घ्यावा. 

No comments:

Post a Comment