बौध्द धर्म आणि जगातील अन्य धर्म यात ब-याच गोष्टी
समान आहेत. तरीही या धर्मात व इतर धर्मात एक एक आगळा वेगळा फरक आहे. तो म्हणजे
बौध्द धर्मात देवाला /ईश्वराला /परमेश्वराला स्थान नाही. गौतम बुद्धाने बुध्द
धर्माची स्थापना केली. वार्धक्य, दारिद्र, रोग व मृत्यू या व्यथांचा अर्थ कसा
लावावा. हा बुध्दापुढे मोठा गहन प्रश्न होता. या समस्येच्या निराकारनार्थ त्यांनी
अनेक प्रयत्न केले. शेवटी त्यांना बोधगयेत बोधी वृक्षाखाली चिंतन करीत असता ज्ञानप्राप्ती
झाली. या ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धाने केलेल्या उपदेशाचा गाभा होता ‘ जीवनातील
दु:खे आणि व्यथाबाबतचे विचार. आपले जीवन, दु:ख आणि व्यथा याच्याशी जखडलेले आहे.
दु:ख व यातना याचा उद्गम आपल्या अभिलाषा आणि लालसा यामधून होत असतो. हे सत्य
स्वीकारलं तरच जन्म व मृत्यूच्या चक्रातून आपली सुटका होणे शक्य. जन्म, मृत्यू व
पुनर्जन्म हा भोगवटा तर प्रत्येक सजीवाच्या वाट्याला येत असतोच. बुध्दाचा उपदेश
होता, आपल्यातील या लालसेचा विळखा आपण काहीही करून सैल केलाच पाहिजे. आपल्यातील
अहंकाराची पकड सैल केलीच पाहिजे. हे साध्य झाले तरच मृत्यू वर मात करुण,
निर्वानाप्रात जाण आपल्याला शक्य होईल. उद्भभवलेल्या या व्यथापासून जर मुक्ती
मिळवायची असेल तर प्रथम तृष्णेपासून मुक्ती मिळवणे अत्यावश्यक आहे.
“करुणा” अतिशय
महत्वाची असते. ती न्यूयार्क मधल्या एखाद्या मोठ्या दुकानात खरेदी करता येत नाही.
ती यंत्रानही तयार करता येत नाही. करुणा हवी तर हवा आंतरिक विकास.
दलाई लामा
No comments:
Post a Comment