Tuesday 11 June 2013

भगवतगीतेवर बौध्द धर्माचा प्रभाव


हिंदू धर्मीय भगवतगीता या ग्रंथास पवित्र ग्रंथ मानतात. सामान्य जनासोबतच भारतीय संतावरसुध्दा  गीतेचा प्रभाव आढळतो. परंतु भारतातील अनेक विद्वान भगवतगीतेचा कार्यकाळ ठरविण्यासाठी टाळाटाळ करीत असतात. भगवतगीतेवर बौध्द धर्माचा प्रभाव असण्याला काही भारतीय विद्वान नकार देतात किंवा चर्चा करण्यास टाळतात. याचा अर्थ गीता ही बुध्दोत्तर काळाच्याही खूप
नंतरची आहे हे सत्य बहुजन समाजाला कळू नये यासाठी गीतेच्या निश्चित काळाबाबत चर्चा करण्यास का-कु करीत असतात. गीतेवर नाकारातमक मते मांडल्यास भारतीय जनमानसात गीतेच्या आस्थेबाबत शंका निर्माण होतील या भीतीने मते न मांडता सत्य इतिहास दडपण्याचा प्रयत्न करने हा एकप्रकारे आपल्या व्यवसायासी केलेली गद्दारीच आहे. पाश्चिमात्य विचारवंत मात्र आपली मते स्पष्टपणे मांडतात. प्रसिध्द जर्मन शास्त्रज्ञ गार्ब यांनी भगवतगीतेचा कार्यकाळ ई.स.पु. २०० मानून गीतेवर बौध्द धर्माचा प्रभाव असल्याचे मान्य केले. सेनार्त यांच्या मते गीता ही बुध्दोत्तरकालीनच काय इ.पू. पहिल्या शतकातीलही मानायला तयार नाहीत. त्यांच्या मते पुरगुप्ताच्या पुत्राने, बालदित्याने एखाद्या ब्राम्हणाकडून भगवतगीता लिहून घेवून महाभारतात घातली असावी.
बौध्दधर्मीय साहित्यात व भगवतगीतेमध्ये अनेक साम्यस्थळे आढळतात. भगवतगीतेमध्ये आलेले अनेक शब्द कोणत्याही उपनिषद वा पुराणात आढळत नाहीत तर ते केवळ बौध्द धर्माच्या ग्रंथात आढळतात. त्यामुळे भगवतगीता ही बुद्धाच्या जन्मानंतरच्या अनेक शतकांनी लिहिल्या गेली हे सिद्ध होते. परिणामी त्या काळात भरभराटीस आलेल्या बौध्दज्ञानाचा प्रभाव भगवतगीतेवर पडला. बाबासाहेब आंबेडकर भगवतगीतेला धम्मपदाची नक्कल मानतात.
निर्वाण हा शब्द केवळ बौध्द धर्मातच वापरला गेला असून बुद्धपूर्व उपनिषदेत तो कुठेही आढळत नाही. निर्वाण हा शब्द गीते मध्ये पाचदा आलेला आहे. निर्वाण या शब्दाप्रमाणेच निर्वैर, अव्देष, करुणा व मैत्री  हे शब्दही आले आहेत. हे शब्द उपनिषदेत आढळत नसून केवळ बौध्द साहित्यात आढळतात. संयुक्त  निकायातील माताली आणि शक्राच्या संवादाचे अनुकरण करून गीतेतील कृष्ण व अर्जुनाचे संवाद रचलेले आहेत. बुद्धाच्या अनेक वचनाचा  गीतेमध्ये अंतर्भाव असला तरी बुद्धांनी नाकारलेल्या ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म याच्या अस्तित्वावर गीतेमध्ये सकारात्मक भूमिका घेण्यात आली. याचा अर्थ गीता लिहना-यांनी तत्कालीन समाजाच्या नाड्या ओळखून त्यांना श्रद्धेच्या जाळ्यात अडकविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला.


गीतेमध्ये योगाचे महात्म्य वर्णिले गेले आहे. गौतम बुद्धाने बुद्धत्वप्राप्तीपूर्व सर्वप्रकारच्या साधनाचा वापर केला होता. बुध्द स्वत: योगी होते. शंकराचार्यांनी बुध्दाला ‘योगिना चक्रवर्ती’ म्हणजे  योग्याचा चक्रवर्ती असे म्हटले. महायान काळात बौध्द धम्मामध्ये योगाचार म्हणजे विज्ञानवादी संप्रदायाच्या परिणामाचे फळ म्हणून योगाचा प्रसार वाढला. पतंजली योगसुत्राचा  रचनाकाळ इ.स. दुस-या शतकापासून ते चौथ्या शतकापर्यंत असल्याचे विद्वान मानतात. यावरून भगवतगीता व पतंजलीवर बौध्द विचार व साधनाचा प्रभाव आहे.

No comments:

Post a Comment