प्रस्तावना
अहिंसा म्हणजे हिंसा न करणे. परंतु याचे कठोर विश्लेषण केल्यास कोणताही धर्मज्ञ व उपासक त्यांचे तंतोतंत पालन करण्यास अक्षम्य असतो. कारण कळत न कळत प्रत्येकाच्या हातून हिंसा होत असते. जसे कि रस्त्याने चालताना कोणाच्याही पायाखाली सूक्ष्मजीवजंतू येवून त्यांचे मरणप्राय होणे.परंतु बौद्ध धम्मात अहिंसेकडे बघण्याचा अर्थ व परिस्थितीनुसार त्याचा दृष्टीकोन एका वेगळ्या स्वरूपाचा आहे. तो कसा आहे ? हे बघितले पाहिजे.