Tuesday, 21 August 2012

The Compassionate Buddha by Dr. C.S. Shah

'The absolutely sane man' the world had ever seen. He refused rituals and gods, Atman andParamatman, but never compromised on reason. His efforts at last led him to experience the Truth and he became Buddha, The Enlightened. The Truth and Knowledge flowed from his every pore as Compassion, in his austerities and tapas, kindness and humility, and suffering and feelings.And what a sacrifice to realize the Truth! Palace and luxury, wife and son appeared pigmy in front of the loftiness of the desire to seek the Highest. He was ahead for his time, liberal and kind, and had selected Yashodhara as his bride. They had happy married time. No want, no misery, no worries. And one dark night (I am tempted to say 'one fine night') the farewell! Thrice Buddha went back to the bedside of his sleeping wife. 

Buddhism and Quantum Physics by Christian Thomas Kohl

Abstract
There is a surprising parallel between the philosophical concept of Nagarjuna and the physical concept of reality of quantum physics. The fundamental reality has no firm core but consists of systems of interacting objects. These concepts of reality are inconsistent with the substantial, subjective, holistic and instrumentalistic concepts of reality which are forming the base of modern modes of thought.
Nagarjuna's Concept of Reality
Nagarjuna had been the most important Buddhist philosopher of India. According to Etienne Lamotte his lifetime was in the second part of the 3rd century after Christ. 

Emancipation of the Buddha

Many many years back, there was a village in the Himalayas where the inhabitants were primarily Buddhists. The village was completely isolated from the rest of the world and had a very peaceful and self-sufficient existence. Due to the altitude at which the village was located, the winters here were long and severe. The summer months were the time when the villagers would collectively gather, grow and store firewood and food to help tide the long winter months. 

The Eight Fold Path

Buddhism does not aim to explain God, creation or eternal concepts. Such truths can only be found within the heart of a person. 

Whatever one holds within the heart is what is. 

What Buddhism does aim to do is help us overcome the chaos of this world and point us to a path that leads us to our own spirituality. 

We are all searching for the same things - freedom from our pain and realizing who we truly are, deep within. 

The Buddha, Siddharth Gautama, in his contemplation, realized the truth about suffering and the path to liberation from it. This Eight-Fold Path and Four Noble Truths make up the foundation of Buddhism.

Wednesday, 15 August 2012

बौध्द धर्म


बौध्द धर्म आणि जगातील अन्य धर्म यात ब-याच गोष्टी समान आहेत. तरीही या धर्मात व इतर धर्मात एक एक आगळा वेगळा फरक आहे. तो म्हणजे बौध्द धर्मात देवाला /ईश्वराला /परमेश्वराला स्थान नाही. गौतम बुद्धाने बुध्द धर्माची स्थापना केली. वार्धक्य, दारिद्र, रोग व मृत्यू या व्यथांचा अर्थ कसा लावावा. हा बुध्दापुढे मोठा गहन प्रश्न होता. या समस्येच्या निराकारनार्थ त्यांनी अनेक प्रयत्न केले. शेवटी त्यांना बोधगयेत बोधी वृक्षाखाली चिंतन करीत असता ज्ञानप्राप्ती झाली. या ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धाने केलेल्या उपदेशाचा गाभा होता ‘ जीवनातील दु:खे आणि व्यथाबाबतचे विचार. आपले जीवन, दु:ख आणि व्यथा याच्याशी जखडलेले आहे. दु:ख व यातना याचा उद्गम आपल्या अभिलाषा आणि लालसा यामधून होत असतो. हे सत्य स्वीकारलं तरच जन्म व मृत्यूच्या चक्रातून आपली सुटका होणे शक्य. जन्म, मृत्यू व पुनर्जन्म हा भोगवटा तर प्रत्येक सजीवाच्या वाट्याला येत असतोच. बुध्दाचा उपदेश होता, आपल्यातील या लालसेचा विळखा आपण काहीही करून सैल केलाच पाहिजे. आपल्यातील अहंकाराची पकड सैल केलीच पाहिजे. हे साध्य झाले तरच मृत्यू वर मात करुण, निर्वानाप्रात जाण आपल्याला शक्य होईल. उद्भभवलेल्या या व्यथापासून जर मुक्ती मिळवायची असेल तर प्रथम तृष्णेपासून मुक्ती मिळवणे अत्यावश्यक आहे.

“करुणा” अतिशय महत्वाची असते. ती न्यूयार्क मधल्या एखाद्या मोठ्या दुकानात खरेदी करता येत नाही. ती यंत्रानही तयार करता येत नाही. करुणा हवी तर हवा आंतरिक विकास.
                                               दलाई लामा

Wednesday, 1 August 2012

चला, पॅगोडा पाहायला!

गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, राणीची बाग ही आतापर्यंतची मुंबईत पर्यटकांसाठी आकर्षण असलेली ठिकाणे. गेल्या काही वर्षांत यात भर पडलीय गोराई येथील पॅगोडाची. मुंबईच्या गजबजाटापासून काहीसा दूर, पण मुंबईतच असलेला हा पॅगोडा पाहण्यासाठी दिवसाला दोन ते तीन हजार पर्यटक येतात. त्यात दिवसागणिक वाढच होत आहे. आशियातील सर्वात उंच पगोडा म्हणून याची ख्याती आहे. एकता शहा। दि. १ (दहिसर)
एस्सेल वर्ल्डला जाताना बोटीत बसण्याआधीच दूर असलेला उभट सोनेरी घुमट लक्ष वेधून घेतो. जसजसे या घुमटाच्या दिशेने जातो तसतसे त्याचे कोरीव काम अधिक उठून दिसते. हाच तो दाट झाडांमधून दिसणारा बौद्ध मंदिर पॅगोडा. 
पॅगोडाला जाताना पहिले प्रवेशद्वार लागते ते म्हणजे सांची गेट. याची उंची ६0 फूट आहे. आत प्रवेश करताच दुसरे ७२ फुटी बरिमस गेट लागते. तेथून पुढे आले की डाव्या दिशेला बरिमस सरकारने देणगीदाखल दिलेला एक गौण बेल, ज्याचे वजन १३ टन आहे. त्याला घेऊन चार २0 फुटी धम्मसेवक उभे आहेत. वरती चढताना जे संगमरवर लावले आहे, ते ही बरिमस येथून आणले आहे. भारतीय संगमरवराच्या तुलनेत हे अधिक थंड आहे. या ठिकाणी हजारो पर्यटक येत असल्याने त्यांच्या सोयीसाठी बरिमस हॉस्टेलचे काम सुरू आहे. मध्यभागी असलेल्या पॅगोडाची उंची व लांबी ३२५ फूट आहे. जेव्हा गौतम बुद्ध साधना करायला बसायचे तेव्हा त्यांची लांबी व उंची एक सामान होती, म्हणून यांचीही लांबी व उंची एकसमान आहे. हे पगोडा बर्मा [मेन्मार्ग] येथे असलेल्या सुडुकोनचे प्रतिबिंब आहे. या घुमटाच्या वरच्या दिशेला पावित्र्याचे प्रतीक असलेला ३ फुटांचा क्रिस्टल आहे. त्यावर ४७0 लहान घंट्या लावल्या आहेत. हवेने वाजणार्‍या या घंट्यांमुळे धम्म सगळीकडे पसरतो, असे मानले जाते. पॅगोडाला लागणारे दगड हे राजस्थान (जोधपूर) येथून देणगीदाखल आले आहेत. हा घुमट केवळ दगडावरती उभारला आहे. कोणत्याही प्रकारचा सिमेंटचा किंवा एकही खांबाचा वापर केलेला नाही. दरवाजासाठी लागणारी लाकडे ही बर्मा येथून आणली आहेत. घुमटाच्या आत प्रवेश केल्यास एक भव्य सभागृह लागते. त्याच्या चोहोबाजूला काच लावली आहे. पर्यटकांना केवळ या दरवाजातूनच प्रवेश दिला जातो. येथेच बसून विपश्यना केली जाते. घुमटाच्या आतील बाजूला एक ६ टनांचे धर्मचक्र आहे. त्यात गौतम बुद्धांच्या सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीच्या अस्थी आहेत. त्या श्रीलंका सरकार व बौद्ध सोसायटी ऑफ कोलकाता यांनी दिल्या आहेत. या भव्य हॉलमध्ये एका वेळी ८ ते १0 हजार लोक बसू शकतात आणि त्याच्या मध्यभागातील व्यासपीठावर बसून धर्मगुरू उपदेश करतात. त्यांचे आसन वतरुळाकार फिरत असते. १५ मिनिटांत ते एक फेरी मारते. मागच्या बाजूला शांतीचे प्रतीक असलेला अशोकस्तंभ आहे. 
दक्षिण दिशेच्या एका घुमटात १0८ शून्यागार, म्हणजेच ३ बाय ६ आकाराच्या खोल्या आहेत. येथेच बसून विपश्यना केली जाते. विपश्यना केंद्रात १0 दिवसांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. लहान मुलांसाठीही वेगळे प्रशिक्षण दिले जाते. पहिल्या मजल्यावर व्हीडीओ गॅलरी आणि गं्रथालय असून, तेथेच बुद्धांचा जीवनपट उलगडणार्‍या महत्त्वाच्या घटना आणि प्रसंगांची १२२ पेंटिंग्ज आहेत. सत्यनारायण गोयंका यांनी १९९६ साली पॅगोडाची संकल्पना मांडली आणि त्यानंतर २000 पासून पॅगोडाच्या कामाला सुरुवात झाली. गुरुपोर्णिमा, बुद्धपोर्णिमा, शरद पोर्णिमेदरम्यान पर्यटकाची संख्या १८ ते २0 हजार होते.