Thursday, 13 November 2014

मोदीच्या बौध्दधर्म प्रेमामागील खरे वास्तव (लोकमत :ले. पुण्याप्रसून वाजपेई)

जपानच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी क्योटो येथील तोजी बौद्ध मंदिराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी किंकाकुजी बौद्ध मंदिरालाही भेट दिली. याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात नेपाळ येथे सार्क राष्ट्रांची परिषद होणार आहेस त्याही वेळी ते काठमांडू येथील बौद्धनाथ किंवा स्वयंभूनाथ स्तुपाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. तेथे अमनिभा मोनॅस्टरीला भेट देण्याची इच्छा ते व्यक्त करण्याची शक्यता आहे. हे सर्व उगाचच घडत नाही. त्यामागे निश्चित असा हेतू आहे. मोदी यांनी सर्वप्रथम भूतानला भेट दिली त्यामागेसुद्धा त्यांचा असाच निश्चित हेतूृ होता. ज्या-ज्या राष्ट्रांत बौद्ध धर्माचा प्रसार झाला आहे आणि जेथील सरकारे बौद्ध धर्माने प्रभावित आहेत, त्या-त्या राष्ट्रांना ते